Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

रशियन महिलेकडून पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबईच्या चेंबूर भागात एका रशियन महिलेवर बलात्कार झाल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षकाने वारंवार बलात्कार केल्याचा गुन्हा या महिलेने दाखल केला आहे. ही महिला २००४ मध्ये बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी व्हीसीट व्हिसावर आली होती. मात्र व्हीसाची मुदत संपल्यावर तिची गाठ पोलीस निरीक्षक अनिल जाधवशी पडली. अनिल जाधवने या महिलेचा बनावट पासपोर्ट बनवून दिला. त्यानंतर तो सातत्याने तिला धमकी देऊन बलात्कार करत होता असं त्या महिलेने आरोप केला आहे. रशियन महिला तीन वेळा गर्भवतीही राहिली. दोन वेळा महिलेचा गर्भपात करण्यात आला. महिलेला आरोपीपासून झालेला एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. पोलीस निरीक्षक अनिल जाधवचा याआधीच विवाह झाला आहे. तक्रारदार रशियन महिला आणि तिच्या मुलाला अनिल जाधवने मारण्याचाही प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर अनिल जाधवला निलंबित करण्यात आलं आहे. 

ठाण्यात ट्रकची आणि दुचाकीची भीषण धडक; माय-लेकीचा मृत्यू

ठाणे येथील भाईंदर पाडा परिसरात ट्रक आणि दुचाकीत धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आई आणि 3 वर्षाच्या चिमुरडीचा दुर्देवी अंत झाला. लीलावती विश्वकर्मा असे आईचे नाव असून प्रांजळ असे 3 वर्षाच्या चिमुरडीचे नाव आहे. ट्रक चालकाने भारधाव वेगात ट्रक चालवल्यामुळे दुचाकीला धडकली आणि हा अपघात झाला. नेमकं काय घडलं ? दिलीप विश्र्वकर्मा आपल्या दुचाकीवरून पत्नी आणि मुलीसह राहत्या घरी जात होते. त्याच वेळी घोडबंदर रोडवर भाईदर  पाडा  या ठिकाणी एक भरधाव ट्रॅकने या दुचाकीला घडक दिली. या अपघातात माय लेकीचा जागीच मृत्यू झाला. तर दिलीप विश्र्वकर्मा गंभीर जखमी झाला. कासारवडवली पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

दिवाळीपासून मुंबईच्या लाइफ लाइनमध्ये आता Wi-Fi

मुंबईच्या लाइफ लाइन म्हणजे लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार असल्याने मुंबईकरांना रेल्वेतर्फे दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. मुंबईकरांचा बराच वेळ लोकलमध्ये प्रवास करण्यात जातो. त्यामुळे प्रवाशांच्या विरंगुळासाठी लोकलमध्ये Wi-Fi उपलब्ध होणार आहे. लोकलमध्ये Wi-Fi – मुंबईकरांचा प्रवास सुखाचा व्हावा म्हणून रेल्वेने मुंबई लोकलमध्ये Wi-Fi  बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत आता मुंबईच्या लोकलमध्ये Wi-Fi बसवलं जाणार आहे. या सुविधेमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता रेंज नसणे आणि बफरींगचा आता सामना करावा लागणार नाही. ट्रेनमध्ये वाय-फाय लॉगइन करुन ही सुविधा प्रवाशांना वापरता येणार आहे. Wi-Fi असल्यामुळे लोकलमध्ये प्रवाशांच्या इंटरनेट डेटाची बचत होणार आहे. ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत  रेल्वेतील 165 लोकलमध्ये हे Wi-Fi बसविण्यात येणार आहे. यामध्ये प्री-लोडेड गाणी, मालिका आणि चित्रपटांचा समावेश असणार आहे. मध्य रेल्वेने खासगी कंपनीसोबत 5 वर्षाचा करार केला आहे. ही सुविधा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

मुंबईत रात्री तीन ठिकाणी आग, जीवितहानी नाही

मुंबईत बुधवारी रात्री तीन ठिकाणी  आग  लागण्याच्या घटना घडल्या. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बुधवारी रात्री सांताक्रुझ येथील मिलन सब-वे येथील एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत तीन गोदामे जळून खाक झाली आहेत. मात्र आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. १० गाड्यांच्या सहाय्याने ही आग अवघ्या दहा मिनिटातच नियंत्रणात आणण्यात आली. वडाळ्यातही गणेशनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. या आगीत सहाजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आग्रीपाडा येथे एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागली. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांच्या सहाय्याने ही आग नियंत्रणात आणण्यात आली. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

सलमान खानच्या केअर टेकरला अटक, जबरी चोरी करुन 29 वर्ष पोलिसांना देत होता गुंगारा

मागील 29 वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका भामट्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा भामटा अभिनेता सलमान खानच्या गोराई बीच येथील फार्महाऊस मध्ये आपली ओळख लपवून केअर टेकर म्हणून राहत होता. अखेर पोलिसांनी त्याचा भांडाफोड करत त्याला अटक केली आहे. आरोपीचे नाव शक्ती सिद्देश्वर राणा आहे. आरोपीने 1990 मध्ये आपल्या साथीदारांसह एका व्यक्तीच्या घरात घुसून जबरी चोरी करत मारहाण केली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं होतं. कालांतराने तो जमिनीनावर मुक्त झाला होता. परंतु या नंतर मात्र तो न्यायालयात नियमितपणे हजर न राहता आपली ओळख लपवून गोराई बीच येथील सलमानच्या फार्महाऊसमध्ये 15 वर्षांपासून राहत होता. सलमानच्या बंगल्यावर गेल्या 15 वर्षांपासून शक्ती हा केअर टेकर म्हणून काम करीत होता. सध्या शक्ती याचे वय 62 वर्षे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुंबईच्या वरळी येथे सन 1990 मध्ये शक्ती राणा आणि त्याच्या साथीदार एका घरात घुसले. घरातील व्यक्तींना मारहाण केली आणि किंमती वस्तू घेऊन पसार झाले होते. याप्रकरणी शक्ती आणि त्याच्या स...

धारावीत 8 लाख 17 हजारांची रक्कम पकडली

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या राज्यभरात सुरु आहे. राजकीय पक्षांचे उमेदवार सभा घेत, जनतेत जाऊन आश्वासनांची खैरात देत आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगही आपले काम जोरदार बजावत आहे. उमेदवारांना दिलेल्या आचारसंहितेचे पालन होते का? याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. शहरातील संशयित गाड्यांवरही नजर ठेवली जात आहे. याच पार्श्वभुमीवर धारावी भागात आज सकाळी दहा वाजता निवडणूक आयोगाच्या पथकाला 8 लाख 17 हजार रुपये इतकी संशयीत रक्कम पकडण्यात यश आले आहे. सकाळी सायन जंक्शन जवळ वाहन क्र. MH-04, HX-1116 पांढऱ्या रंगाची हुंडाई क्रेटा या वाहनाची तपासणी केला असता धीरेन कांतीलाल छेडा या गृहस्थाच्या गाडीत ही रक्कम सापडली. हा संशयित घाटकोपर पूर्व येथे राहणारा आहे. धारावी पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार नोंदविल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली

आजारपणाला कंटाळलेल्या पित्याकडून दोन मुलांची हत्या

घाटकोपरच्या इंदिरानगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. आपल्या आजाराला कंटाळलेल्या एका पित्यानं आपल्याच दोन मुलांची निर्घृण हत्या केलीय. मुलांच्या हत्येनंतर आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या डोक्यात घोळत होता. परंतु, त्याआधीच या पित्याला पोलिसांनी अटक केली. चंद्रकांत मोहिते असं या दुर्दैवी पित्याचं नाव आहे. पत्नी आणि दोन मुलांसोबत चंद्रकांत घाटकोपरच्या इंदिरानगर परिसरात राहत होता. परंतु, चंद्रकांतला क्षयरोग (टीबी) झाल्याचं निदान झालं... आणि तो मानसिकरित्या खचत गेला.  टीबी या रोगाचं वेळीच निदान झालं तर त्यावर उपचार शक्य आहेत. परंतु, आपल्या आजारामुळे नैराश्यवस्थेत गेलेल्या चंद्रकांतला आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती. या नैराश्यवस्थेतच मुलांना ठार करून आत्महत्येचा विचार त्याच्या डोक्यात आला.  'रात्री मुलांना गरबा पाहण्यासाठी घेऊन जातोय' असं सांगून चंद्रकांत गाडी घेऊन निघाला होता. त्याने ११ वर्षीय मुलगी गौरवी मोहिते आणि ७ वर्षीय प्रतिक या मुलांना साताऱ्याच्या दिशेने नेले आणि रस्त्यातच गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:च नातेवाईकांना फोन क...

भाज्यांचे दर कडाडले, ग्राहक हैराण

                 भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाज्यांच्या उत्पादनात घट आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.  तर सर्वसामान्यांना कांदाही रडवत आहे. गेल्या काही दिवसांत भाज्यांचे भाव कडाडलेत. अधूनमधून सुरू असलेल्या पावसाचा भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर चांगलेच वाढलेत.   भाज्याची आवक ३० ते ४० टक्के कमी झाली आहे. त्यामुळे भाज्या कडाडल्या आहेत. तर कांदा सध्या ग्राहकांना राडवत आगे. पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली आणि आता त्याला भावही मिळत नाही. नुकतंच शेतकऱ्यांनीही आंदोलन केल्यामुळे मुंबईत कांदा महाग झाला आहे. परवापर्यंत ३० ते ३५ रुपयांनी घाऊक बाजारात विक्रीसाठी आलेला कांदा आज ४० ते ४५ रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना हाच कांदा ५० ते ५५ रुपये किलोने विकत घ्यावा लागत आहे.  भाज्यांचे दर (किलो) भाजी  आजचे भाव मागील...

सीवूड्समध्ये किडेच किडे, नागरिक त्रस्त

नेरूळ भागातील सीवूड्स परिसरात किड्यांनी उच्छाद मांडला असून या किड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सीवूड्स रेल्वे स्थानकातून सेक्टर नवीन ५० च्या दिशेने  नवी मुंबई  महानगर पालिकेकडे जाणाऱ्या रोडवर या किड्यांचा गेली दोन दिवस सुळसुळाट झाला आहे. परिसरातील रोड, सोसायटीच्या भिंती आणि झाडांवर हजारो किडे आहेत. हे किडे अंगावर पडल्याने नागरिकांच्या शरीराला खाज येत असल्याच्या तक्रारी येत आहेत

फॅन्सी नंबरप्लेटला करा बाय; जाऊ शकतो परवाना

तुमच्या दुचाकीची किंवा कारची नंबरप्लेट फॅन्सी प्रकारातील असेल, तर सावधान.... तुमचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. मुंबई वाहतूक पोलिसांनी सर्व विभागीय  आरटीओ  कार्यालयांना तशा सूचना दिल्या आहेत. अशा फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकी किंवा कार या अगोदर सापडल्या असतील, आणि त्यांना सूचना देऊनही त्या व्यक्ती नंबर न बदलतात तशाच दुचाकी किंवा कार चालवताना आढलल्या तर त्यांचे परवाने रद्द करून टाकावेत अशी स्पष्ट सूचना वाहतूक विभागाने आरटीओंना दिल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्ट अशा ८ महिन्यांच्या कालावधीत फॅन्सी नंबरप्लेट धारण करणाऱ्या २२७२ व्यक्तींना चलान पाठवण्यात आले होते. हे नंबरप्लेट देवनागरी आणि फॅन्सी पद्धतीने टाकण्यात आले होते. या सर्वांना टेक्ट मेसेज पाठवून वाहतूक पोलिसांनी अशा नंबरप्लेट बदलण्याच्या सूचनाही केल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी पकडलेल्या २२७२ पैकी ११ जण अशा नंबरप्लेटसह दुसऱ्यांदा आढळून आले असल्याचे मुंबई वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले. अशा दुसऱ्यांदा पकडण्यात आलेल्या लोकांचे परवाने रद्द करण्याविषयीच्या सूचना आम्ही आरटीओ कार्यालयांना दिल्या असल्या...

बिचुकलेंची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

कायम चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. बिचकुले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. बिचकुले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचकुलेंपेक्षा चौपटीहून अधिक असल्याचे दिसत आहे. अलंकृता यांच्या नावावर ३ लाख ६६ लाख ८१८ रुपये आहेत असं बिचकुलेंनी स्पष्ट केलं आहे. वरळीतून अपक्ष निवडणूक लढवणारे बिचकुले यांनी आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. ७५ हजारांची रोख रक्कम आपल्याकडे असून याशिवाय तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये आहेत असं बिचकुलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती ७८ हजार ५०३ इतकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्य...

अरेच्चा! दगडी चाळीत ‘डॅडीं’सारखा दिसणारा हा कोण?

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. लगेच तिथल्या लोकांनी डॅडींना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायला सुरुवात केली. काहींनी हारही घातले. त्या वेळी काही लोकांनी निरखून पाहिले असता 'डॅडीं'च्या वेशात चक्क अभिनेते मकरंद देशपांडे होते. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक आलेला एक दरारा हे सर्व पाहून तिथल्या लोक भारावून गेले. परंतु, हे खरे डॅडी नसून अभिनेते मकरंद देशपांडे आहेत हे दगडी चाळीतील लोकांना काही वेळाने लक्षात आले. मकरंद यांच्याकडे पाहून खुद्द 'डॅडी' असल्याचाच भास सर्वांना झाला. मकरंद देशपांडे यांनी सुद्धा 'डॅडीं'चे व्यक्तिमत्व, वेशभूषा तंतोतंत साकारली होती. दगडी चाळीत जाण्याचे खरं तर खास निमित्त होते. तिथे जाऊन मकरंद यांनी देवीची आरती करत, २०२० मध्ये प्रदर्शित होणाऱ्या संगीता अहिर मुव्हीज निर्मित 'दगडी चाळ २' या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली.

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

पीएमसी बॅंक खातेधारकांचे किला कोर्टसमोर आंदोलन, पोलिसांचा हस्तक्षेप

पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राकेश वाधनान याचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर आंदोलन केले. बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.  पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेशकुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.   पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघडकीस येतायत. बँकेमध्ये २१ हजार ४९ खाती बनावट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या बँकांचे केवायसी करण्यात आलेलं नाही. केवळ एक्सेल शिटमध्ये या खात्यांची माहिती ठेवण्यात आलीये. २०१७पासून हा प्रकार सुरू असून बँकेतल्या केवळ ६ जणांनाच याची माहिती होती, असं आता उघड झाले आहे. ऑडिटर, ऑडिट कमिटी एवढंच नव्हे, तर बँकेच्या संचालक ...

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

रेल्वे पोलिसांकडून ‘कोम्बिंग ऑपरेशन’

विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेल्वेतून रोख रकमेसह अन्य वस्तूंची वाहतूक केली जाण्याची शक्यता आहे. त्याला आळा बसावा यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाने ‘कोम्बिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. यासाठी विशेष पथक तैनात केल्याची माहिती सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी रोख रक्कम, दारू व अन्य वस्तूंचीही देवाणघेवाण होण्याची शक्यता असते. त्यासाठी लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधून त्याची प्रवाशांमार्फत वाहतूक होऊ शकते. त्याला आळा बसावा यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई सुरू केली आहे. यासाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सकाळी पाच आणि रात्रीच्या तपासणीसाठी दहा जवान या पथकात आहेत. त्यांच्याकडून फलाट व लोकलमधील संशयित प्रवाशाकडील सामान तपासले जात आहे. या पथकासोबत डॉग्ज स्क्वॉडही आहे. सकाळी सात ते आठ लोकल व मेल-एक्स्प्रेस व रात्री पाच ते सहा लोकल व मेल-एक्स्प्रेस गाडय़ा त्यांच्याकडून तपासणी केली जात आहे. याशिवाय सुरक्षा दलाच्या अन्य जवानांनाह...

फटका गँगसमोर मध्य रेल्वे दुर्बळ!

लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाइल किंवा पर्स लंपास करणाऱ्या फटका गँगसमोर मध्य रेल्वे यंत्रणा हतबल झाल्याचे चित्र आहे.गेल्या पाच दिवसांत अशा दहा घटनांमध्ये चोरीच्या उद्देशाने प्रवाशांवर हल्ले करण्यात आले. एकटय़ा जीटीबी नगर स्थानक परिसरातच पाच गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करताना अनेक प्रवासी मोबाइलवर बोलतात. काहींच्या बॅगा खांद्याला अडकवलेल्या असतात. हीच संधी रुळांलगत दबा धरून बसलेले चोर साधतात. रुळांच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबांच्या जवळच किंवा झाडांमध्ये लपून बसलेले लोखंडी किंवा लाकडी वस्तूने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर जोरदार फटका मारतात. फटका गँग म्हणून कुख्यात असलेल्या या चोरांविरोधात जानेवारी ते ऑगस्ट २०१९ पर्यंत २८१ पेक्षा जास्त गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. वडाळा हद्दीत सर्वाधिक ५२ घटना घडल्या असून वडाळा ते जीटीबी नगरदरम्यान २५ आणि किंग्ज सर्कल ते वडाळादरम्यान  १२ घटनांची नोंद आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिस...

आरेतील वृक्षतोडीस स्थगिती

मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष पीठाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर पर्यावरणविषयक खटले चालविणाऱ्या खंडपीठापुढे २१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आरेतील वृक्षतोडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने सोमवारी विशेष सुनावणी घेतली. राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला. आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडसाठी जितकी झाडे कापणे गरजेचे होते तेवढी वृक्षतोड झालेली आहे. त्यासाठी आता आणखी वृक्षतोड होणार नाही, असे मेहता यांनी न्यायालयात सांगितले. वृक्षतोडीबाबत कायदेशीर बाबींचा निर्णय पर्यावरणविषयक खंडपीठाने घ्यावा, अशी भूमिका मेहता यांनी मांडली. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील संजय हेगडे आणि गोपाळ शंकर नारायणन यांनी युक्तिवाद केला. आरे हे जंगल आहे की नाही याबाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. शिवाय, आरे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ आहे की नाही, याबाबतही अजून राष्ट्रीय हरित लवादाने निकाल दिलेला नाही. त्यामुळे आरेत...