Skip to main content

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण




रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय?

इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क.


देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे.
TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे.

गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत
IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आहे. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व मोबाईल कंपन्यांना सूचनाही केल्या आहेत.
IUC पूर्ण रद्द करण्याची शेवटची मुदत 1 जानेवारी 2020 आहे. त्याअगोदर हे दर बंद होणं अपेक्षित आहे.
Jio  ने दिलेल्या माहितीनुसार, आउटगोइंग कॉल्सला लावलं जाणारं शुल्क हे IUC मुळे आहे. त्यामुळे IUC बंद होईल त्यादिवशी पुन्हा एकदा जिओचे सर्व कॉल्स फ्री होतील.
10 ऑक्टोबरनंतर काय असेल फ्री?
जिओ टू जिओ फोन
जिओ टू लँडलाइन फोन
जिओवरून दुसऱ्या नेटवर्कच्या मोबाईलवर केल्या जाणाऱ्या फोनला 6 पैसे मिनिट या दराने शुल्क द्यावं लागेल.
फ्री कॉलिंगची सुविधा दिल्यामुळे देशभरात मोबाईल क्रांती आणणाऱ्या Rilance Jio रिलायन्स जिओने त्यांच्या धोरणात मोठा बदल केला आहे.

Jio जिओ फोनवरून दुसऱ्या कंपनीच्या मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी  हे पैसे पडणार आहेत.  रिलायन्स जिओची सेवा आता पूर्णपणे मोफत मिळणार नसल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC)ग्राहकांकडून वसून करण्यासाठी धोरणामध्ये हा बदल करण्यात आला आहे.

Jio नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि 2G नेटवर्क असल्याने अन्य मोबाईल कंपन्यांचे ग्राहक जिओ ग्राहकांना मिस्ड कॉल देतात आणि जिओवरून मग फुकट कॉल केला जातो, असं जिओचं म्हणणं आहे. Airtel आणि Vodafone-Idea चे 35 ते 40 कोटी 2G ग्राहक रिलायन्स जिओ नेटवर्कवर दररोज किमान 25 ते 30 कोटी missed call देतात, असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. इतर कंपन्यांना जिओ यासाठी 13500 कोटी रुपये मोजत आहे.

जिओ ग्राहकांना केलेलं (Jio to Jio free) कॉलिंग मात्र पूर्वीसारखं मोफत असणार आहे. आउटगोइंगवरचे 6 पैसे प्रतिमिनिट हे शुल्क तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे स्पष्ट करताना जिओने सांगितलं की, TRAI ने सांगितलेली टर्मिनेशन चार्जेस व्यवस्था लागू होत नाही, तोवर हे शुल्क लागेल. 1 जानेवारी 2020 पासून हे IUC बंद होणार असल्याची माहिती आहे.

Comments

Popular Posts

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.