बातमी दक्षिण आफ्रिकेतून.. बॉक्सबर्गच्या टॅम्बो मेमरिअल रुग्णालयाजवळ एका एलपीजी टँकरमध्ये भयानक स्फोट (Tanker Blast) झाला.. यात आतापर्यंत 20 जणांचा (20 death) मृत्यू झालाय. रुग्णालयाजवळच काही अंतरावर भूयारी मार्गातून जाताना टँकरला अपघात झाला. त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस लीक झाल्यानं हा स्फोट झाल्याचं समजतंय.. रस्त्यावरच्या काही कारही यात बेचिराख झाल्यायत. तर स्फोटानंतरच्या कानठळ्या बसवणा-या आवाजांनी रुग्णालयातही गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अनेकजण गंभीररित्या भाजल्यानं रस्त्यावरच विव्हळत होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
News about the current incidents in Mumbai