Skip to main content

बिचुकलेंची संपत्ती पाहून व्हाल थक्क!



कायम चर्चेत असलेल्या बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबर रोजी त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. बिचकुले यांनी दाखल केलेल्या अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामधून त्यांच्या संपत्तीबद्दलची माहिती समोर आली आहे. बिचकुले यांनी आपली एकूण संपत्ती केवळ ७८ हजार ५०३ रुपये इतकी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांची पत्नी अलंकृता यांच्या नावावर बिचकुलेंपेक्षा चौपटीहून अधिक असल्याचे दिसत आहे. अलंकृता यांच्या नावावर ३ लाख ६६ लाख ८१८ रुपये आहेत असं बिचकुलेंनी स्पष्ट केलं आहे.
वरळीतून अपक्ष निवडणूक लढवणारे बिचकुले यांनी आपल्याकडे दागिने, गाडी, पॉलिसी असं काहीही नसल्याचं म्हटलं आहे. ७५ हजारांची रोख रक्कम आपल्याकडे असून याशिवाय तीन बँकांमध्ये ३ हजार ५०३ रुपये आहेत असं बिचकुलेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आपली एकूण संपत्ती ७८ हजार ५०३ इतकी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पत्नी अलंकृता यांच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम, बँक खात्यांमधील रक्कम, पॉलिसी, दुचाकी, सोन्या चांदीचे दागिने अशी एकूण ३ लाख २६ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे असं या प्रतिज्ञापत्रात बिचकुलेंनी स्पष्ट केलं आहे. अलंकृता यांच्या नावावर  ८० हजारांची दुचाकी आणि ९० हजार किंमतीचे तीन तोळे सोने आहे
विशेष म्हणजे बिचकुले दांपत्याच्या नावावर एकही स्थावर मालमत्ता नसल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. अभिजित बिचकुले यांनी मागील पाच वर्षांमध्ये एकदाही आयकर भरलेला नाही. तर पत्नी अलंकृताने २०१५-१६ मध्ये ४६ हजार ९९४ रुपयांचा आयकर भरला आहे. त्यानंतर २०१६-१७ मध्ये ९० हजार रुपये, २०१७-१८ मध्ये ७५ हजार रुपये, २०१८-१९ मध्ये एक लाख ५ हजार ५९५ रुपये तर २०१९-२० मध्ये ६९ हजार ३६० रुपये आयकर अलंकृता यांनी भरला आहे. याशिवाय साताऱ्यामध्ये आपल्याविरोधात एक खटला सुरु असल्याचेही बिचकुलेंनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.
बिचकुले हे यावेळी आदित्य यांच्याविरोधात वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आदित्य हे पहिलेच ठाकरे आहेत. ३ ऑक्टोबर रोजी आदित्य यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. वरळी मतदारसंघांमध्यून आघाडी आणि मित्रपक्षांनीही अॅड. सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे

Comments

Popular Posts

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.