Skip to main content

पीएमसी बॅंक खातेधारकांचे किला कोर्टसमोर आंदोलन, पोलिसांचा हस्तक्षेप




पीएमसी बॅंक खातेधारकांनी मुंबईत किल्ला कोर्टच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत राकेश वाधनान याचे वकील अमित देसाई यांच्या कारसमोर आंदोलन केले. बँकेच्या ग्राहकांनी मुंबईतील दिवाणी न्यायालयाबाहेर रास्तारोको केला. आरोपींना जामीन देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. एचडीआयलचे सारंग वाधवान, राकेशकुमार वाधवान आणि बँकेचे माजी संचालक वरियमसिंग यांच्या पोलीस कोठडीत १४ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, वाधवान यांच्या वकीलाच्या गाडीवर पाण्याच्या बाटल्या फेकत निषेध व्यक्त करण्यात आला.  

पंजाब अँड महाराष्ट्र बँकेतल्या भ्रष्टाचाराचे एकेक नवनवे प्रकार दररोज उघडकीस येतायत. बँकेमध्ये २१ हजार ४९ खाती बनावट असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या बँकांचे केवायसी करण्यात आलेलं नाही. केवळ एक्सेल शिटमध्ये या खात्यांची माहिती ठेवण्यात आलीये. २०१७पासून हा प्रकार सुरू असून बँकेतल्या केवळ ६ जणांनाच याची माहिती होती, असं आता उघड झाले आहे. ऑडिटर, ऑडिट कमिटी एवढंच नव्हे, तर बँकेच्या संचालक मंडळापासूनही ही बाब दडपण्यात आली होती.

HDIL चे राकेश वाधवान आणि सारंग वाधवान. मुंबईत प्रचंड ताकतवान झाले होते. इतके ती सगळ्यांनाच त्यांची दहशत वाटू लागली होती. लवकरच ईडीकडून त्यांचे काळे कारनामे उघड होतील अशी शक्यता आहे. अलिबागमधील २२ खोल्यांच्या अलिशान बंगला जप्त केला आहे. पीएमसी बँक अपहारप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल हे बाप-बेटे राकेश आणि सारंग वाधवान. ८०च्या दसकात वसई-विरारमध्ये त्यांनी रियल इस्टेटचा धंदा सुरु केला. त्यावेळी वसई-विरारवर भाई ठाकूर यांचा एकछत्री अंमल होता. याचा वाधवान कुटुंबाने पुरेपूर फायदा उलला. भाई ठाकूर यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्तापीत केले आणि त्यांच्या मदतीनेच रियल इस्टेटच्या धंद्यात पाऊल टाकल्याची बाब पुढे आली आहे. त्यानंतर ते अधिकाधीक बलशाली बनत गेले.

Comments

Popular Posts

IUC चार्जेस म्हणजे काय? JIO चं फ्री कॉल बंद झाल्यामागे आहे हे कारण

रिलायन्स जिओने Jio आजपासून फ्री आउटगोइंग कॉल्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Relaince JIO जिओ नेटवर्कवरून दुसऱ्या कुठल्याही इतर मोबाईल नेटवर्कवर केल्या जाणाऱ्या फोनला आता 6 पैसे प्रतिमिनिट एवढं शुल्क लागणार आहे. 10 ऑक्टोबरपासून जिओच्या ग्राहकांना आउटगोइंग कॉल्ससाठी IUC रिचार्ज व्हाउचर्स घ्यावी लागणार आहेत. प्रत्येक 10 रुपयांच्या रिचार्जवर 1 GB डेटा फ्री मिळणार आहे.  रिलायन्स जिओच्या वतीने ही शुल्कवाढ नसून IUC चार्जेसची वसुली असल्याचं म्हटलं आहे. हे IUC चार्ज म्हणजे काय? इंटरकनेक्ट यूसेज चार्जेस (IUC) म्हणजे एका मोबाईल नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कमधल्या मोबाईलला कनेक्ट करण्यासाठीचं शुल्क. देशभरात IUC चा दर सारखाच असावा यासाठी TRAI टेलिफोन रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया  आग्रही आहे. TRAI ट्रायने ठरवल्यानुसार सध्या IUC चा दर 6 पैसे प्रतिमिनिट इतका आहे. तोच रिलायन्स जिओच्या ग्राहकांना आता आउटगोइंग कॉल्ससाठी द्यावा लागणार आहे. गेल्या तीन वर्षांत जिओने IUC साठी इतर मोबाईल कंपन्यांना 13 हजार 500 कोटी रुपये मोजले आहेत IUC शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा TRAI चा आग्रह आह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज दोन तासांसाठी वाहतूक बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही तांत्रिक कामानिमित्त आज(दि.९) दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेलजवळ ओव्हर हेड गँट्री बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने याबाबत माहिती दिली. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक १२ ते २ या वेळेत बंद राहणार आहे. या वेळेत या मार्गावरील सर्व प्रकारची जड आणि मालवाहतूक करणारी वाहने एक्सप्रेस वे वरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी ५२ किमी अंतरावर थांबवण्यात येतील. तर चारचाकी आणि इतर प्रवासी वाहने कुसगाव टोलनाक्यावरून जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात येतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. एक्सप्रेस वे वरून प्रवास करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी २६ सप्टेंबरला काही तांत्रिक दुरुस्तीसाठी मुंबई-पुणे महामार्ग वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता

एका बॅगमुळे हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीत; पेंटाग्राफला आग

हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ट्रेनच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्यानं चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या गाडीच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. त्यानंतर सर्वत्र धुर पसरल्याने रेल्वे स्थानकात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील रेल्वेचे वेळापत्रक मात्र कोलमडले. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.